तो भयाण रस्ता

अजिंक्य टांकसाळे

रमेश आणि सुरेश हे अतिशय चांगले मित्र कॉलेजमध्ये होस्टेल वर एकमेकांची रूममेट्स, वेगवेगळ्या शाखांमध्येही शिकत असुनहीं दोघांची मैत्री अतिशय घनिष्ठ होती. रमेश हा शरीराने चिप्पाड पण मनाने जरा कमजोर होता. तर सुरेश सामान्य अंग काठीचा पण मनाने एकदम कणखर पण दोघे मिळून मात्र ते अनेकांवर भारी होते. एकदा असाच सुरेश कॉलेजमधून आला ते एक नवीन भूत डोक्यात घेऊन, आपल्या इतर काही मित्रांकडून त्याने ऐकले होते की एक अतिशय चांगला असा नवीन सिनेमा आला आहे. त्याला देखील तो पाहण्याची इच्छा आवरली नाही. आणि त्याने रमेशला याविषयी सांगितले. तसं पाहायला गेला तर त्याचे कॉलेज शहरापासून साधारण ११ किमी. दूर होतं. आणि ज्या भागात ते होतं तो भाग देखील तसा दुर्गमच होता. आणि मग सिनेमागृह देखील त्यांच्या त्या जागेपासून साधारण ५ कि.मी. होताच. शिवाय ऑक्टोबरचा महिना चालू असल्याकारणाने थंडी पडलेली होतीच. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या असून रमेशने सुरेशला न जाण्यासाठी समजवण्याचा प्रयत्न केला. पण सुरेश ऐकून घ्यायला तयार नव्हता. त्यामुळे नाईलाजाने त्यानेही ऐकून घेतले. आणि मग संध्याकाळी ८ वाजता जायचा बेत बनला. ठरल्याप्रमाणे दोघेही ८ वाजता पोहचले. चित्रपट पाहून झाल्यावर त्यांच्या लक्षात आले की, ११.३० वाजत आले होते. खुप उशीर झाला होता हे दोघांच्याही लक्षात आले. ते दोघेही सिनेमागृहाच्या खाली येऊन रिक्षाची वाट बघु लागले. पण फारच उशीर झाल्या कारणाने कोणतेच वाहन रस्त्यावर नव्हते. काहीच वेळात सिनेमागृहातील सगळी गर्दी नाहीशी झाली आणि केवळ हे दोघेच तिथे उरले. आता १२ वाजत आले होते, आणि थोड्याप्रमाणात दोध्यांच्याही मात्र काहीच दाखवत नव्हते. आता काही वेळ इथे थांबायचे आणि कोणीच नाही आल तर पायी चालत जायचे असा निर्णय त्यांनी घेतला,

काहीच वेळात अचानक एक माणूस तेथे आला. हातात एक छोटीशी पिशवी आणि साधारण काही विचित्र वेशभूषा अशी काहीशी त्याची स्थिती होती. हा नेमका कुठुन आला या गोष्टीचा दोघेही विचार करू लागले. शिवाय त्याच्या चेहऱ्यावरचे ते विचित्र भाव दोघांनाही विचलित करत होते. पण तरीही ते दोघे तसेच रिक्षाची वाट पाहत उभे राहिले. काही वेळानंतर त्यांच्या लक्षात आले की तो माणुस काही बडबडत होता. नीट ऐकण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या काही लक्षात आले नाही. त्या माणसाच्या अश्या विचित्र वागण्यामुळे सुरेश जरा चिडला. आता बहुतेक रिक्षा येत नाही आपण पायीच निघूया' अस म्हणुन तो तडक निघाला. त्याची ही अशी विचित्र वागणूक पाहून रमेश थोडा बिचकला पण मग तीही त्याच्या मागे चालू लागला. १२.३० वाजता आले होते. आणि समोर ५ किमीचा निर्मनुष्य रस्ता दोघांपुढे होता. शिवाय काही पुढे गेल्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना जंगल होते. शहराच्या पूर्णपणे बाहेर असलेला हा मार्ग तसा भयानकच होता. पण काहीच मार्ग न उरल्याने कसेतरी दोघेही निघाले. अतिशय दबक्या पायांनी कोणाला समजणार नाही अश्या प्रकारे दोघेही पुढे जाऊ लागले. त्या माणसाचा पुटपुटण्याचा आवाज अजूनही येतच होता. पण तो आवाज अचानक बंद झाला. रमेशने मागे वळून पाहिले आणि तो एकदम थंड पडला. जो माणूस इतक्या वेळापासून तिथे उभा होता तो अचानक गायब झाला होता. त्याने आसपास नजर फिरवली पण कुठेच तो दिसला नाही. ही गोष्ट त्याने लगेच सुरेशला सांगितली पण मनाने खंबीर सुरेश ने रमेशला शांत करण्यासाठी काहीतरी तक देऊन ती गोष्ट शांत केली, पण मनातून तोही बराच घाबरला होता. तो माणूस आधीच होता म्हणून ते निघून गेले होते आणि आता तो दिसत नाहीये यामुळे ते अजुनच घाबरले पण कशी तरी भिती दाबून ते चालत राहिले. 

बराच वेळ काही न झाल्याने दोघेही जरा शांत झाले होते. त्यांची भिती कमी झाल्याने त्यांचा वेगही वाढला होता. काहीच वेळात ते जंगलाच्या जवळ आले. तसं ते जंगल नव्हतं पण रात्री खूप दाट झाडी आणि काळोखात ते जंगलापेक्षा कमी नव्हतं. अगदी रिक्षावालेही या जागेत यायला घाबरायचे. आता हे पार करणे हा या दोघांसमोरचा मोठा प्रश्न होता. पुढे जाण्याअगोदर दोघांनाही आपल्या मनाची चांगली तयारी करून घेतली आणि ते निघाले. आता मोबाईलच्या प्रकाशात पुढे जात असताना सुरेशला परत तसाच बडबडण्याचा आवाज आला. आता मात्र तो फार घाबरला. मागे वळून पाहण्याची त्याची हिंमत होत नव्हती. पण तरीही तो वळला आणि टॉर्चच्या प्रकाशात त्याने सगळीकडे पाहिले पण मागे त्याला कोणीच दिसले नाही. आभास झाला असावा म्हणून तो परत चालू लागला. थोड्याच वेळात तसाच आवाज दोघांनाही ऐकू आला. आता मात्र आभास असू शकत नाही हे दोघांनाही लक्षात घेतले आणि काहीही न म्हणता केवळ त्यानी एकमेकांकडे पाहिलं आणि ते सरळ पळू लागले. काही अंतर पळाल्यानंतर दमल्यामुळे ते थांबले आणि मागे पाहू लागले. मागे कोणीच न दिसल्याने जरा धासत श्वास आला आणि ते शांत झाले. मात्र रमेश आता जरा चिडला होता. त्याने समजावूनही सुरेशने न ऐकल्याने ते अश्या ठिकाणी अडकले आहेत असे म्हणून तो चिडचिड करू लागला. सुरेश देखील ऐकुन घेणाऱ्यामधला नव्हता. तोही भांडू लागला. __ असं सगळ चालू असताना तो माणूस आता त्या जंगलातून बाहेर आला. आणि त्यांच्याकडे एकटक बघु लागला. त्याचं ते पुटपुटन चालूच होतं. त्याला पाहून दोघेही शांत झाले. काय करावं कोणालाच कळत नव्हतं. एव्हाना दोघेही त्या जंगलाच्या मधोमध आले होते. त्यामुळे आता इथून मागे वळणेही कठीण होते अचानक तो माणूस सुरेशकडे येऊ लागला. आणि काही क्षणात तो त्यांच्यापुढे उभं राहून प्रश्नार्थक पद्धतीने काही तरी परत बडबडू लागला. सुरेश देखील त्याच्या लयीत मिसळून गेला आणि त्याला 'काय' असे विचारणार तेवढ्यात रमेश अचानक बेशुद्ध झाला. है पाहून सुरेश ठिकाणावर आला आणि रमेशला उठवायचा प्रयत्न करू लागला. कसबस मारून सुरेशने रमेशला उठवल. आणि तौ उठताक्षणी घाबरून दोघेही परत पळू लागले. पण या वेळी तो माणूसही त्यांच्या सोबत पळू लागला. हे पाहून दोघेही जाम घाबरले आणि जीव मुठीत धरून आरडाओरडा करत पळू लागले. तेव्हाच समोरून एक रिक्षा आली आणि दोघेही तिला धडकून खाली पडले. धडक चांगलीच जोरात होती. दोघेही बेशुद्ध झाले. काही वेळानंतर जेव्हा त्यांना शुद्ध आली तेव्हा ते दोघेही रिक्षात होते. त्या रिक्षावाल्याने त्यांना कॉलेजच्या जवळ आणले होते. ते उठल्यावर त्याने त्यांना पळण्याचे कारण विचारले. आणि त्यांनी त्याला सगळी घडलेली घटना सांगितली. हे एकल्या नंतर मात्र तो रिक्षावाला ने बोलला ते ऐकुन दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली. बऱ्याच वर्षांपूर्वी जेव्हा या जागेचा जास्त विकास झालेला नव्हता तेव्हा त्या जंगलात काही चोर राहायचे. रात्री अपरात्री कोणी जर तेथून जात असेल तर त्याला लुटायचे आणि बर्याच वेळा मारून पण टाकायचे. एकदा असाच एक व्यापारी त्या रस्त्याने चालला होता. घरी त्याचा लहान मुलगा खुप आजारी होता. म्हणून तो रात्रीच निघाला होता. आणि वाटेत त्या चोरांनी गाढले. त्याने निमुटपणे त्याचे सगळे पैसे वगैरे दिले आणि त्यांना जाऊ देण्याची विनवणी करू लागला. पण त्यांनी त्याच ऐकुन घेतल नाही. आणि तो त्याच्या मुलाकडे जाऊन देण्याची मागणी करत असताना त्याच्या डोक्यात मागून कोणीतरी दगड घातला आणि तो आपल्या मुलाचे नाव घेत जागीच मेला. त्यानंतर एक एक करून काही दिवसातच सगळे चौर तेथे मृत अवस्थेत सापडले. पण त्यामधला एक पळून गेला. अस म्हणतात की आजही तो व्यापारी त्या चोराची तिथे वाट पाहत   आहे. आणि त्यामुळे तो अनेकांना दिसला आहे पण त्यातले फारच कमी लोक वापस आले. तो येतो आणि काहीतरी बडवडतो. जर त्याला कोणी 'काय' हा प्रश्न विचारला तर मग त्याला तो है ऐकुन सुरेश आणि रमेश दोघेही थंड पडले. आपण थोडक्यात वाचलो आहोत हो गोष्ट त्यांच्या लक्षात आली.

आपल्याला वाचवायला येणारा तो रिक्षावाला देवानेच पाठवला असावा असं म्हणून त्यांनी देवाचे आभार मागितले. आणि त्या रिक्षावाल्याला धन्यवाद देऊन तो आपल्या हॉस्टेलकडे जायला निघाले. पण मनात असंख्य प्रश्न तसेच होते. अचानक त्यांनी आपले घड्याळ पाहिले आणि ते पाहुन दोघांचेही चेहरे परत उतरले कारण त्यात अजुनही १२.३०च वाजले होते, आणि जेव्हा त्यांनी मागे वळून पाहिले तेव्हा तेथे कोणताच रिक्षावाला त्यांना दिसला नाही.