संध्याकाळ

श्रद्धा पाथरकर द्वितीय वर्ष, वस्त्र तंत्रशास्त्र अभियांत्रिकी

गार वारा झोंबणारा, 

दाही दिशातुन वाहणारा,

गंध फुलांचा 'मंद' त्यातून दरवळतसे... त्या रम्य संध्याकाळी सूर्य जाई मावळतीला... 

जणू भासे तो बुडालेला सोन्याचा गोळा... पक्षी परतती घरट्यात.....

गुरे वासरे गोठ्यात..

शीतल तो चंद्र घेई जन्म आकाशात... सोबतीला चांदण्या त्या,

आकाश सारे उजळून जाई...

अन् संध्याकाळ सरून,

तिच्या मागोमाग रात्र येईल...