राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

नागार्जुन कोमलवाड वस्त्र तंत्र शास्त्र

राष्ट्रसंता तु पाहिलसं स्वप्न उज्ज्वल गावगाड्याचं पण आज तोच गावगाडा उद्धवस्त होताना पाहतोय मी दारूच्या नशेत, सत्तेच्या व्यवस्थेला लाचार होताना निसर्गही कोपतोय आता माझ्या बळीराजावर भलता माणसे आता हातात काट्य घेऊन सज्ज आहेत. जाती, धर्माच्या नावावर एकमेकांचा जीव घ्यायला या सगळ्यात मला तुझी ग्रामगीताचं आशेचा किरण दिसतेय, पण आता धजावत नाहीत माणस तीही वाचायला आजकालची महाराज मंडळी राहिली नाहीत. साधी ४ शब्द सांगायला १० हजार भाव असतो त्यांचा ती पण आयोजकाची तळवे चाटुन गुणगाण गाण्यात मग्न असण्यात.... आता माझ्या या भग्न, मग्न झालेल्या समानाला तुझ्यासारख्या युगपुरूषाची नितांत गरज भासतेय. कुणी कुठे का जाईना मी मात्र तुझा आदर्श समाजाच्या स्वप्नांसाठी स्वत:पेटवून घेण्यास सज्ज आहे. तु फक्त पेट घ्यायला लागणारी ज्वाला माझ्या हृदयात भिनव...