काहीतरी बदलल्या सारखं वाटते...

गणेश गाढे (पाटील) द्वितीय वर्ष स्थापत्य

पावसात भिजण्याचा मोह तेव्हा असायचा

चातका सारखी त्या पावसाची आस असे त्याच पावसाची आता मोठी भीती वाटते. बहुतेक काहीतरी बदलल्या सारखं वाटते

 

सुखात आणि संकटात जे चिटकुन असायचे 

बाहेरून ओरडायचे पण मनातून पाळायचे 

एक भेट सुद्धा त्यांची आता नकोशी असते 

बहुतेक काहीतरी बदलल्या सारखं वाटते

 

गोट्या लंपडाव यातच आमचे जीवन होते त्यांनीच बांधले आमच्या मैत्रीची नाते आता त्याच्या जागी WhatsApp FB बहुतेक काहीतरी बदलल्या सारखं वाटते

 

सारा दिवस आई बाबांसोबत जायचा भाऊ बहिणी मध्येच जगाचा भास व्हायचा

दोन मिनीट सुद्धा बोलणं नकोस वाटते बहुतेक काहीतरी बदलल्या सारखं वाटते

 

खाऊ, बाहुली, चेंडू याच होत्या गरजा त्यातच व्हायच्या आनंदाच्या बेरजा

आता बापाच्या डोळ्यात गरजांची भीती दिसते.

बहुतेक काहीतरी बदलल्या सारखं वाटते.