काहीतरी हरवलय!

धनश्री जायले द्वितीय वर्ष, शंपाण्वकीय व दूरसंचार अभियांत्रिकी

इकडे नाही तिकडे नाही 

पण कुठेतरी ते दडलंय

माहिती नाही कुठे काय 

पण काहीतरी ते हरवलंय

 

कळत नाही शोधु काय

जणु कुठे लपून बसलंय

आत्ताच तर होतं इथे 

जे काही ते हरवलंय

 

नकळतच मन माझं

कुठेतरी तर गुंतलंय

असंख्य विचार सोडून उघडे

नक्की काहीतरी हरवलंय

 

नकोशा त्या गोष्टीला 

जणू मन माझं घाबरलंय

कशी शोधु कुठे शोधु

जे काही ते हरवलंय

 

गुंतलेलं मन माझं 

जणू स्वत:च्या शोधात निघालंय

नकळत कधी भेटावं 

जे काही ते हरवलंय..