स्वप्न

वैष्णवी काळे द्वितीय वर्ष स्थापत्य

स्वप्नांच्या दुनियेत माझ्या येती सारे सारे, धुंद पावसासोबत वाहती मनात आनंदाचे वारे, 

स्वप्न ते सारे सत्य होऊनी जगावे, स्वप्नपूर्तीसाठीच तर दिवसरात्र धजावे, जगावे ते स्वप्न आता सांजकाळ न बघावी, होऊनी ती पूर्ण आपल्या आयुष्यात सजावी, 

स्वप्नांची ही दुनिया न्यारी यावी आपल्या दारी, 

पुर्ण कराया ती स्वप्न मग असतील अनेक कैवारी...