स्नायूंचा व्यायाम

लक्ष्मण तिडके संगणक विज्ञान व अभियांत्रिकी

मल्लखांब या खेळात अनेक कोनातून सारे शरीर फिरविले जाते. त्यामुळे शरिरांतर्गत इंद्रियाना तसेच क्षणाक्षणाला होणाऱ्या स्नायुंच्या आकुंचन व प्रसरणामुळे स्नायुंनाही भरपूर व्यायाम मिळतो. 

स्थैर्यवृत्ती 

मनाची एकाग्रता स्नायुंची लवचिकता व चापल्या, सांध्यांची कार्य क्षमता व पाठीच्या कण्याला उत्तम व्यायाम मिळतो. शारिरीक आणि मानसिक पातळीवर या खेळामध्ये मानसिक स्थैर्यवृत्तीची जडणघडण होते.

तंदुरूस्ती 

मन, बुद्धी व शरिराच्या विकासामध्ये मल्लखांबाचे महत्वाचे स्थान आहे. शरिराची तंदुरुस्ती आणि शरिर स्वास्थ्य संपादनाकरिता आजच्या फिटनेसमध्ये सुद्धा (तंदुरूस्ती) मल्लखांबाचे स्वत:चे महत्व व अस्तित्व टिकून आहे. मति तल्लख नखशिखांत बलवान माझा खेळ माझी शान