झुंज...!

दीपक जाधव (F.Y. CSE)

जरी संकटांनी तुला रे

दाही दिशांनी घेरलेलं 

भयभीतीचं छोटंसं बीज

मनात तुझ्या रे पेरलेलं 

सांग त्यांना ओरडून जोरात

काय हृदयात तुझ्या कोरलेलं

हार नाही मानणार मी 

जिंकण्याच वादळ मनात शिरलेलं

 

सरकव डोक्यावरचं आभाळ

हातानेच थोडे दाटलेलं 

दाखव त्याला लत्तर तुझं 

मागच्याच युद्धात फाटलेलं

सांग त्याला नेमकंच एक

क्षितीजाकडे फेकलेलं

ज्या संकटाच धड मी

मागच्याच सेकंदाला छाटलेलं 

हसत राहा वर पाहून 

वार आता खाली जात नाही

 

आत्ता हरलोय

आत्ताच चालू

वाट उद्याची पाहत नाही

कारकीर्द चालूच रणांगणावर

शांत मी राहत नाही

मी ओळखतो मला चांगलच

मला हरवण्याच संकटा

तुझ्यात तेव्हढंच साहस नाही.

 

(आत्ता सरळ संकटाच्या डोळ्यात बधून)

 

पूर्ण ताकद लाव तुझी

का तुला ते ही नीट येत नाही

माझे मन असच रे 

चिल्लर संकटांना भाव देत नाही

मी उतरलोय पटांगणात

आज मी काय मैदान सोडत नाही

हीच वेळ आहे पळायची

चल संधी दिली तुला

यावेळेस तेवढं मी मनावर घेत नाही.

 

जर आलच परत तर सांग त्याला

मी अजून हरलो नाही

तुझ्या मागच्याच युद्धातली चाल

मी अजून विसरलो नाही

प्रयत्न चालु असूदे तुझे

मी अजून घाबरलो नाही.

गरूड आभाळाच्या वर उडून परतलाय मी आहे इथेच अजून उतरलो नाही.