कहाणी एका कवितेची....

तन्मय गणेशराव बानकर S.E.Mech.

घंटा झाली वर्ग लागला भरू,

गुरूनींच्या कवितेने तास झाला सुरू

 

पावसाची कविता घेतली शिकवायला, मध्ये मध्ये बोलायची परवानगी नाही कुणाला

 

शब्दांचा पाऊस जणू होता बरसत, कवितेचा आशय जायी मनोमनी झिरपत

 

शेवटच्या बाकावर भितीला टेकून, एकच चिमुरडा होता डोळे गच्च मिटुन

 

मास्तरांच्या रागाचा पाराच चढला, 

जोराने ओरडून उठवले त्याला

 

दमातच घेऊन विचारले त्याला, 'रात्री काय तू सिनेमा पाहिला?'

 

का गोडधोड जेवणावर ताव मारून आलास?

अन् वर्गात ढवारादूर झोपी गेलास!

 

घाबरलेल्या डोळ्यांनी त्याने सरांकडे बघितले,

'गरिब आहे तो, सर' कुणी पटकन बोलले

 

'गरिब। मग कपड्याला कसा अत्तरांचा वास?'

'नाही, सर, उदबत्यांचा वास आहे खास

 

'वडिल नाहीत त्याला, तो काम करून शिकतो.

शाळेत येण्यापूर्वी तो उदबत्या विकतो।'

 

मास्तरांची कविता मग बानुलाच राहिली, त्यांच्या डोळ्यांतील कविता वर्गाने वाहताना पाहिली.