याला जीवन ऐसे नाव

मृणाली प्रवीण वाकोडकर द्वितीय वर्ष,उत्पादन अभियांत्रिकी

थंडीचे दिवस... सकाळचं कोवळ ऊन... पेपर वाचत अंगणात बसले होते. 'गाडीच्या खाली सापडूनही एक दोन वर्षांची मुलगी जीवंत राहते' संपूर्ण बातमी वाचत होते. गल्लीतले ९० वर्षाचे आनीवा गेल्या ५ वर्षापासून कोमात असून मरणाची वाट पाहत आहेत आणि मी वाचलेल्या बातमीमधील त्या बालिकेने मरण जवळून पाहिले.

 

पण..

 

सकाळी अंगणात पारिजात

फुलांचा सहा टाकून मोकळा होतो

रिते होण्याचे समृद्धपण 

तो किती सहजपणे दाखवतो...हेच खरे... हळूहळू उन्हाची दाहकता वाढत होती. शेवटी कोवळे ऊन सुद्धा फार वेळ आनंद देऊ शकत नाही. घरात जाण्यासाठी उभे राहिले तेव्हा माझी नजर रस्त्याच्या मधोमध कोवळ्या उन्हाचा आनंद घेत असलेल्या बेडकाकडे गेली. दरम्यान एक चारचाकी वाहनाचा हॉर्न वाजला तो हॉन ऐकून त्याने उडी घेतली. काय जीवन जगण्याची ती धडपड.... घरात टिवीवर जुने गाने चालू होते, 'जिंदगी के सफर में गुजर जाते है जो मकाम... वो फिर नही आते' जे घडेल ते सहन करायचे असते, बदलल्या जगाबरोबर आपणही बदलायचे असते. घडाळ्याचा काटा पुढे पुढे सरकत होता. ऑफिसला जाण्याची वेळ होत होती. मनातले सगळे विचार बाजूला ठेवून आवरण्यास सुरुवात झाली. १० वाजताये ऊन आणि हवेतील गारवा मनाची द्विधा अवस्था करीत होता. इतक्यात मोबाईलची रिंग वाजली माझे बॉस फोन वर बोलत होते. आपल्या ऑफिसमधील तो प्रामाणिक आणि नेहमी हसविणारा सेवक चंदु नाही का?... तो गेला! थांबले, काय म्हणताय सर ?' तासने बैठक बोलावली होती. त्यात त्याने अतिशय छोट्या छोट्या गोष्टीतून स्वच्छता कशी ठेवता येईल, हे अत्यंत मार्मिक उदाहरणे देऊन पटवून दिले. दुसर्यांना नेहमी हसविण्यास व सामाजिक बांधिलकी असणाऱ्या चंदुने दवाखान्यात नेण्याच्या अगोदरच सर्वांना रडविले... नोकरी लागल्यापासून गेल्या १७ वर्षात त्याने कधीही भाषण नव्हते केले. त्याचा संपर्क सर्वाशीच होता, पण मार्गदर्शन शेवटचे ठरले. हिंदीतील एक शेर आठवला 'जुबाँ न बोले तो मुश्किल नहीं, फिक्र तो तब होती है जब खामोशी भी बोलना छोड़ दे... ऑफीसच्या पायरीवर आज चंदु दिसला नाही सर्वजण एकाठिकाणी शांत उभे होते. मध्येच कुणीतरी त्याच्या जीवनावरील प्रसंगाचा अनुभव देत होता. आज ऑफिसमधील सर्व कर्मचारी त्याच्याबद्दल बरे-वाईट बोलत होते. ज्यांना शब्द सुचत नव्हते ते दुसर्याच्या वाक्याला होकार देत होते. कोकीळा स्वतःची भाषा बोलते म्हणून ती मुक्त असते आणि पोपट दुसऱ्याची भाषा बोलतो म्हणून तो गुलाम ठरतो. असे, अंत आणि एकांत यात माणूस एकांताला अधिक घाबरतो. चंदुच्या जीवनावर प्रकाश टाकत संध्याकाळ झाली, घरी आल्यावर रेडीओवर गाणे ऐकत होते, त्यात ॑जो आवडतो सर्वाना तोचि आवडे देवाला...' हे गीत दिवसभराचा सारांश सांगून गेले. दुसरा दिवस उजाडला. एक नवी आशा एक नवा प्रकाश घेऊन प्रणव मुखर्जी , भूपेन हजारिका, नानाजी देशमुख यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. या सकाळच्या बातम्यांनी मन सुखावून गेले. सहज रस्त्यावर लक्ष गेले. कालचे ते बेडूक आज रस्त्यावर स्वच्छंद ऊड्या मारत होते. जीवन हा पत्यांचा खेळ आहे चांगले पान मिळने आपल्या हातात नाही पण मिळालेल्या पानावर चांगला खेळ करणे हे आपल्या हातात आहे. हेच ते बेडूक सुचवत असावे. स्मितहास्य करून ऑफिसला जायच्या तयारीला लागले. सातव्या वेतन आयोगाची घोषणा झाल्यापासून सर्वजन कामात स्वत:ला गुंतवून घेत होते. वातावरणाचा मागमुस ही ऑफिसमध्ये नव्हता.

'सुख दुःखाने भरले असे 

प्रत्येक व्यक्तीचे जीवन

सहज लीलेने घ्यावे सारे

प्रभुचे आहे समजून'

माझ्या खुर्चीत जाऊन बसले, समोरची फाईल हातात घेतली जी काल अपूर्ण सोडून दिली होती.जीवनातल्या अशाच अपूर्ण फाईल एकदा उघडून बघा.एकदा तरी मागे वळून बघा,जुन्या आठवणी ताज्या करा.डोळे भरून येतील पण मन प्रसन्न राहिल.

हारायचे तर आहे एक दिवस ...मृत्यूकडून!

तोपर्यंत आयुष्याला जिंकून घ्या,

शेवटी काय आयुष्य म्हणजे कुठून सुरू झाले हे जरी माहीत नसेल,तरी कुठे थांबायचे हे समजून आयुष्याला असंच जगायचं असतं..