लाचखोरी का....?

Ayesha Tazeen Fatema Computer Science Engineering (Second Year)

मी काल एका बातमीपत्रात वाचले, एका संरक्षण अधिकाऱ्याने एका महिलेकडून फक्त न्यायालयात तक्रार दाखल करण्यासाठी दोन हजारांची लाच मागितली. तोच मला विचार आला की जर त्या पिडीत महिलेला फक्त तक्रार दाखल करण्यासाठी दोन हजार रूपये द्यावे लागत आहेत तर तिला न्याय मिळेपर्यंत किती खर्च ॑लाच' म्हणून करावा लागेल, हे विचार मनात येताच 'लाचोरी किती गंभीर समस्या आहे ते उमजले. आपला 'भारत' देश जगातील एक प्राचीन देश म्हणून ओळखला जाती. आपल्या देशातील संस्कृती, रीती, परंपरा जगप्रसिद्ध आहेत. या देशाचे नागरिक म्हणून आपल्या सर्वाना अभिमान आहे. पण आपल्या सुसंस्कृत आणि विशाल भारताच्या मध्यावरील डाग म्हणजे 'लाचखोरी आहे. 'लाचखोरी' भारतातून काढून टाकल्यानंतर, इतर समस्या राहणारच नाहीत असे नाही, पण त्यांचा समाजाला कमी प्रमाणात त्रास होईल. "लाचखोरी' मुळे समाजातील प्रत्येक नागरिकाला कधी ना कधी 'रलाच देण्याची परिस्थिती निर्माण होते. कारण लाचं दिल्या शिवाय कुठलाही कार्य पुर्ण होत नाही. विशेषत: सरकारी कार्य..... आपल्या या संस्कृतीच्या देशात ही लाचखोरी आली तरी कुठन? उत्तर आहे 'ऑफिसांमधून,' इंग्रज गेले पण त्यांचे 'ऑफिस' सोडून गेले. ऑफिस'ची स्थापना कार्य सुरळीत व्हावी म्हणून जर झाली असेल तर तीच आन सर्वात अवघड बाब आहे. फक्त साचखोरी मुळे एक प्रश्न सतत आपल्या मनात येतो, आपल्या देशात लाचलुचपत प्रतिबंधक पथक' असताना सुद्धा लाचखोरी संपत का नाही याची मला दोन कारण वाटतात, एक तर लाचखोरी देशात एवढी पसरली आहे की, त्यातून सुटकेचा मार्गच दिसत नाही. आणि दुसरे म्हणजे हे की आपल्याला असे वाटते की, 'लाच दिल्या शिवाय कोणतेही कार्य पूर्ण होणार नाही. सर्वानाच वाटतं की, आपले कार्य लवकर व्हावेत आणि त्यासाठी लाच देऊन देशान आपण लाचखोरीला खत-पाणी घालत आलो आहोत. आणि आता परिस्थिती अशी आहे की, ज्याने लाच दिली नाही त्याला चप्पल पासाव्या लागतात आणि महिने उलटून जातात पण काम होत नाही. म्हणून मग सोयीस्कर मार्ग म्हणजे 'लाच' म्हणूनच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग' असताना सुद्धा सर्वत्र कमी जास्त प्रमाणात लाच घेण्याचे काम चालतेचं एका दोघांची नव्हे तर... संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे की, आपण मनात ठाम निर्णय केला पाहिजे की, मी लाच घेणारही नाही आणि देणारही नाही. तेव्हाच भारतातून लाचखोरीची हकालपट्टी होईल....