" शीतयुद्ध आणि महासत्तापद"

शुभम जगताप (First Year Extc) (2018 BECO35)

१९४८च्या सुमारास दुसऱ्या महायुद्धाचा निर्णायक अंत होत होता. बेनिटो मुसोलिनीची त्याच्याच देशबांधवांनी भर चौकात हत्या केली होती, इटली शरण आला होता. दोहो बाजूनी होणार्या आक्रमणाने जर्मनी थकला होता. आपण आपल्या मातृभूमीचे रक्षण करू शकत नाही या भावनेने हिटलरने आत्महत्यापुढे केलीच होती. परंतु जपान शरण आला नव्हता. समग्र पाशात्य राष्ट्रांना वेठीस धरून जपान एकटा लढत होता. हेच नवल होतं. अटलांटिक सनदेदरम्यान जपानची सर्व नाविक सत्ता अमान्य करण्यात आली होती आणि जपान चिडला होता.जपानने अमेरिकेच्या पर्लहार्बर या नाविक तळावर हल्ला करून आपली धमक दाखवली, इतिहासात प्रथमच अमेरिकन भूमीला युद्धाची झळ पोहोचली. बदल्यात अमेरिकेने जपानवर अणुबाँब टाकले व जपान शरण आला. प्रश्न असा उपस्थित होतो की जपानासारख्या पिटुकल्या राष्ट्रावर अणुबाँबसारख्या सहारक अस्त्र्राचा अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाने वापर करण्याची खरंच गरज होती का? तर अमेरिकेची ही कृती म्हणजे आमच्याकडे हे अमोघ आहे हे जगाला दाखवून आपणच महासत्तेचे खरे दावेदार आहोत असे सांगणे होते असे त्यावेळच्या तत्कालीन इतिहास अभ्यासकांचे म्हणणे होते. जपानवर हल्ला झाल्याचे वृत्त कळताच लाल रशिया सावध झाला. अमेरिकेचे हे कृत्य म्हणने साम्यवादी जगाला दिलेली चेतावनी असून जागतिक शांततला धोका असल्याचे रशियाचे म्हणणे आले. अमेरिकेने अणुबाँबची कल्पना शेवटपर्यंत रशियापासून लपवून इंग्लंड, फ्रान्सशी संगनमत साधून जपानवर हल्ला केला होता. मग अमेरिकेची युद्धासज्जता वधुन रशियानेही अणुप्रकल्प चालू केले. युद्धात झालेल्या भयानक हानीतून सावरून रशियाने जगात पहिला स्पुटनिक-१ उपग्रह अवकाशात झोपावला तेव्हा अमेरिकेचा तिळपापड झाला. अमेरिकेने मग पहिले चंद्रयान बनवले. रशियाने संरक्षणाखातर त्यांच्या क्रेमलिन राजवाड्यावरून (रशियन राष्ट्ध्यक्षांचे निवासस्थान) हवेतून अमेरीकन न्यूयॉर्क, वॉशिग्टन अशा महत्त्वाच्या शहरांवर हल्ला करतील असे ATLAS - ICBM ( Intercontinental Ballistic Missile) प्रणाली विकसित केली. आता मात्र अमेरिकेचे धाबे दणाणले. युद्धात बेचिराख झालेला रशिया आता अमेरिकेलाच आव्हान द्यायच्या तयारीत होता. खरंतर पहिल्या महायुद्धातील हानी भरून काढून रशिया स्थिर झाला होता. तसेच दुसऱ्या महायुद्धातील विजय रशियाच्या लाल सेनेच्या अपूर्व पराक्रमाशिवाय शक्य नव्हताच हे सर्व जग जाणूण होते. त्यामुळे रशियाचे महासत्तापद हे त्याग, पराक्रम व क्रांतीनंतर आलेल्या सामर्थ्यातून मिळालेले तर अमेरिकेला ते व्यापार, बाजारपेठेतून भेटले. युद्ध कधी अमेरिकन भूमीवर घडलेच नाही. म्हणून महासत्तापदाचा खरा दावेदार अमेरिका नसून रशियालाच म्हणावे लागेल.