तो बाप असतो

शुभम बी. घोटी

 तो बाप असतो... जो स्वत: दिवसरात्र राबराब राबतो आलेल्या प्रत्येक संकटाला आनंदाने सामोरे जातो मात्र आपल्या कुटुंबाला आनंदी ठेवतो तो बाप असतो... जो स्वतःचा पोटाला चिमटा काढत जगतो मात्र आपल्या मुलाबाळांना कधीच काही कमी पडु नये याची सतत काळजी घेतो तो बाप असतो... जो स्वत:च्या गरजांना विसरतो मात्र आपल्या मुलाबाळांच्या सर्व मागण्या पूर्ण करतो तो बाप असतो... जो स्वतः दुःखात जगतो, प्रत्येक दुःखाला आनंदाने सामोरे जातो आणि दुःख न सांगता जवळ करतो मात्र आपल्या परिवाराच्या आनंदात समाधान मानतो तो बाप असती... जो स्वत:चे स्वप्न अपूरे ठेवतो मात्र आपल्या मुलांचे स्वप्न नक्कीच पूर्ण व्हावे यासाठी अहोरात्र झटतो, मेहनत करतो तो बाप असतो. तो प्रत्येक क्षणाला मुलांचा विचार करतो सतत त्यांचा अभिमान बाळगतो, कधीतरी रागवतो, कधीतरी मारतो तरी स्वत:पेक्षा जास्त आपल्या मुलांवरच प्रेम करतो तो बाप असतो.. जो मुलीच्या लग्नात ताठ मानेने चालतो मात्र मुलीला सासरी धाडतांना आमच्या चिमणाची काळजी घ्या हो असं हात जोडून सांगती तो बाप असतो संसाराला एक गाडं मानल तर ते गाडं चालवणारी जरी माय असली ना तरी निमूट पणे चटके सोसणारा, सहन करणारा तो बापच असतो...