बदलेली ती

शुभांगी कुलकर्णी (तृतीय वर्ष)

जुन्या आठवणी ताज्या झाल्या.. 

आज तिने जुने फोटो पाहिले. बदललेल्या तिच्या चेहऱ्याबरोबर तिचे बदलेले व्यक्तिमत्त्व तिला अजूनच अस्वस्थ करीत होते.

बदल सकारात्मक की नकारात्मक ह्या गोंधळातच तिचे वेडे मन गुंतले. नकारात्मकतेने घ्यावे तर तिचे कोवळे मन कोठेतरी हरवले होते. परंतु हाच कोवळ्या मनावर झालेले घाव व जखमा कटोरपणा येण्यास अडवू शकले नाही. खूप वेळा तिचे विचार केला परंतु पहिल्यासारखे व्हावे मात्र 'येरे माझ्या मागल्या'गत् तेच दुःख भोगण्यात कसलं

आलय सुख? 

त्यावेळी पडलेल्या प्रश्नांची उत्तर तिला उलगडत गेली. 'लोक इतकी कठोर कशी बनतात?' हा त्यावेळी पडलेला प्रश्न तिला आज उत्तरला तो ही एका सुंदर उदाहरणासोबत.. जे प्रतिबिंब तिने आज आरशात पाहिले. तिच्या दिसणाऱ्या परंतु मुळात वेगळ्या असणाऱ्या त्या (प्रतिबिंबाने) तिला प्रश्न केला, 'तूच का ती जिने कोणाचे मन दुःखावले की मुळुमुळु रडत बसायची? दिवसेंदिवस विचारमग्न असायची?' 

भेडसावणाऱ्या ह्या प्रश्नांना अंत नव्हता व्याकुळतेने छिन्नभिन्न झालेले तिचे मन तिने एकवटले. डोळ्यातील अश्रु पुसले भूतकाळात जाऊन एक कटाक्ष टाकला. धैर्य एकवटून उत्तर दिले. 

होय मीच ती जिच्या डोळ्यात अश्रू नेहमी उपस्थिती लावायच्या ते अश्रू माझ्या कोवळेपणाची साक्ष जरूर देत होते परंतु त्याचे मोल मात्र शून्य होते. कारण त्यांची कदर आणि किंमत काळाबरोबर संपत गेली. उघड्या पायांना बोचरणारे काटे हे चपलीची सवय लावून देतात. त्याचप्रमाणे सतत चांगूलपणामध्ये होरपळलेली मन कठोरतेला जबाबदार ठरतात आणि समान त्या कठोरतेला दोष देतो त्यामागील कारण जाणवण्याचे धैर्य देखील दाखवत नाही. हाच तो समाज जो माझ्यामध्ये बदल घडवून आणण्यास समर्थ उरला व हाच तो समाज जो असमर्थाला बदलाची कारण विचारत आहे.

आणि तिच्याबरोबर अजून एक जण रडला तिचे प्रतिबिंब.!