तू फक्त माझा असावं म्हणुन...!!

गौरी कुहेकर द्वितीय वर्ष स्थापत्य अभियांत्रीकी

तुझी वाट बघण्यात पण एक वेगळीच मजा असते...

येणारा प्रत्येक क्षण ढकलण्यात माझी नेहमी परीक्षा असते,

तुझ्यावर माझ्या रूसून बसण्यात फक्त निखळ ओढ असते, 

तू फक्त माझा असावं म्हणुन तर सगळी उठाठेव असते.... 

अल्लड नाही रे मी... फक्त माझी जिद्द असते.

तू मला विसरायला नको म्हणुन प्रश्नांची सरबत्ती असते, 

विश्वास पूर्ण आहे मला तुझ्यावर पण तरी थोडी भीती असते, 

तू फकत माझा असावं म्हणुन तर सगळी उठाठेव असते...

 

तशी मी रोजच रागावते पण त्याला प्रेमाची किनार असते... 

तुझ्या केविलवाण्या प्रयत्नांनाही मधाची गोडी असते. 

तुला त्रास द्यायला आवडतो मला कारण, तू फक्त माझा असावं म्हणुन तर सगळी उठाठेव असते....

 

तू समोर आल्यावर उगाच एक हास्याची लकेर असते...

तुझ्यावर रागावण्यात माझी नेहमीच हार असते, 

तुझ्या समोर मी उगाच अवखळ असते, 

तू फक्त माझा असावं म्हणुन तर सगळी उठाठेव असते...!!