सैनिकांची मनोगाथा

चिन्मय ज्ञाते (Sy Instru)

घर तर मी ही सोडलं होतं, 

Comfort zone सोडून श्वत्व देशाला बहाल केलं होतं 

सर्व मित्र वर्ग शहरात गेला, नौकरी धंदा शोधू लागला.

 

घर तर मी ही सोडल होतं, 

कुटूंबावर तुळशीपत्र ठेवलं होतं, 

प्रत्येक दिवस वर्षागणिक वाटायचा

एक एक क्षण अश्रु अनावर करायचा

 

घर तर मी ही सोडलं होतं, 

ओढ होती त्या मातेची जिच्या समोर भारत

भू ला प्राधान्य दिलं होतं

आठवत होती ती त्यागाची मूर्ती सहचारिणी,

जपत होती कुटुंब व सर्व प्रेमळ आठवणी

 

घर तर मी ही सोडलं होतं, 

एक दिवस आनंदाने येण्यासाठी 

तोच आनंद आज येण्याचा होता,

फक्त होतो एका पेटीमधे व सभोवती तिरंगा

लपेटला होता.

 

घर तर मी ही सोडलं होतं, 

Comfort zone सोडून स्वत्व देशाला बहाल केलं होतं.