Justice for Asifa

नागार्जुन कोमलवाड तंत्रशास्त्र

हिंदुत्ववादातील शैतानी प्रवृत्ती हिंदू या शब्दाचा अर्थच समाजशास्त्राच्या पुस्तकात काही असा सापडतो, 'एक जगण्याची समृद्ध विचार प्रणाली', कालच्या जम्मू काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात आसिफा बानु या ८ वर्षाच्या मुलीवर नशेची औषधी देऊन सलग ४ दिवस मंदिरात बलात्कार करून तिचा खून केला जातो. तो पण मुस्लीमद्वेष मनात बाळगून यावर कळस म्हणजे तेथील सर्वपक्षीय कार्यकर्ते, हिंदु बांधव जेव्हा आरोपीच्या समर्थनार्थ उरतात तेव्हा मात्र आपण हिंदू आहोत याची लाज वाटायला लागते. ज्या महान हिंदू संस्कृतीच्या आदर्शवत जीवनपद्धतीचा, परंपरेचा (जातीव्यवस्थेसारख्ये अपवाद सोडले तर) जगभर आदर केला जातो. त्या व्यवस्थेला काळीमा फासण्याचं काम सध्या तथाकथि हिंदूत्ववादी लोक करतायेत. मग तो कालच प्रसंग असू दे, का आसाराम बापुंसारखे असंख्य बाबा लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली जेलमध्ये असो. हिंदुत्ववाद फक्त आजकाल मला दहशतीसाठी, राजकारणासाठी, गुन्हेगारीसाठी वापरण्यात येणारं साधन झालय अस सध्या परिस्थितीला अनुसरून वाटायला लागतं. असिफावर प्रामुख्याने असलेला सहभाग चौकशीसाठी दखल अंदाज करणारी प्रशासन व्यवस्था यामुळे समाजवादी देशाची वाटचाल. तालीवानवादी कट्टर मुस्लीम वेळी, तिच्या लज्जा रक्षणासाठी धावणाऱ्या भगवान श्रीकृष्णांचे वारसदार आज जर बलात्कारी माणसांच्या संरक्षणार्थ जर रस्त्यावर उतरत असतील तर मग अशा कित्येक द्रोपदीच्या वखहरणांची तयारी समाजाने करायला हवी. मग त्याच रामायणाला, महाभारताला विचारांची पायमल्ली वाटतो. ज्या शिवाजी महाराजांनी भगवा झेंडा एक आदर्श शासनव्यवस्था स्थापन करण्यासाठी वापरला, स्वराज्यातील मुस्लीम स्त्रीयांना सुद्धा मातेसमान वागणूक दिली, आणि त्याच भगव्या झेंड्याखालच्या मंदिरात एका निरागस मुलीवर निर्दयीपणे सतत ४ दिवस बलात्कार होते. तेव्हा मंदिरातील देव शरमेने झुकलेला असतो. आज आपण समाजातील विघातक कृत्यांकडे जातीधर्मांच्या चष्मातून पहायला लागलो तर देशातील समाजव्यवस्थेच नैतिक पतन झाल्याशिवाय राहणार नाही, त्याची आता सुरुवात झालीये असं म्हणायला हरकत नाही. काही जन आता तालीबान येथे होणारे स्त्रीयांवर अत्याचार, मुस्लीम राष्ट्रात होणारे स्त्रीयांचे नैतिक अधःपतन यांचे व्हीडिओ पाठवतील. त्या बलात्कार्यांच्या सन्मानार्थ त्यांना एवढंच सांगू इच्छितो की, तुम्ही असल्या समाज कृत्यांमध्ये जर हिंदू म्हणून समर्थन करत असाल तर तुम्हाला हिंदू म्हणून जगण्याचा हक्क नाही. तो तुम्ही गमावलेला असेल. तुमच्या असल्या कृत्यांने रामायण, महाभारतासारखी महाकाव्य आगीत भस्मसात झाल्यावाचून राहणार नाहीत. आणि मग भस्म झालेल्या महाकाव्याच्या राखेतून तुमच्यासारखी शैतानांची पैदाईश होईल पुन्हा हाहाकार मानवायला, मंदिरातून किंचाळ्या येतील असंख्य असिफाच्या पुन्हा एकदा, मंदिरे बांधून असली समाजविघातक काम जर होत असतील, तर तो राम मूर्ती म्हणून जिवंत राहणार असेल, राममंदिरासाठी जर कुणाचा जीव घेत असाल, दंगली पेटवत असाल तर मग तो राम न जन्मलेलाच बरा..